शेती करताना कोणत्या प्रकारची काळाजी घ्यावी

बागायती शेती-
भारत हा शेती प्रधान देश आहे, असे आपण नेहमी ऐकतो आणि वाचतो याचा अर्थ बहुसंख्य लोक शेती करतात. आणि त्यांची उपजिविका शेतीवर अवलंबून असते. शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातीलच एक –
बागायती शेती. बागायती शेती ही भरपूर उत्पन्न किंवा नफा देणारी शेती असली, तरी तिच्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे, शेती करताना कोणत्या प्रकारची काळाजी घ्यावी याकडे देखिल आपण लक्ष द्यायला हवे.

सर्वात पहिले आपण बागायती शेतीसाठी कशी जमीन असावी हे पाहुयात-

पर्जन्यावर कमीतकमी अवलंबित्व व पाण्याची निश्चित उपलब्धता असणाऱ्या जमीनींना बागायती जमिन म्हटले जाते. यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार वर्षभर पिक घेतली जाऊ शकतात. यात सुद्धा हंगामी किंवा बारमाही बागायती असे दोन प्रकार आहेत.

बागायती शेतीचे फायदे –

१) जास्त उत्पन्न – नियमित पाणीपुरवठा असल्याने पिकांचा विकास चांगला होतो आणि उत्पन्न, जास्त मिळते.

२) अनेक पिकांचे उत्पादन – बागायती शेतीमुळे एकाच शेतात वर्षभर विविध प्रकारची पिकं घेता येतात, जसे की फळं, भाज्या आणि फुले.

३) पिकांची गुणवत्ता – योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो.

४) जोखिम कमी – अवर्षण किंवा अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान होण्यासी शक्यता कमी असते.

५) आर्थिक स्थिरता – चांगले उत्पादन मिळाल्यामुळे शेतक-यांना आर्थिक स्थिरता मिळते आणि नवनवीन शेती तंत्रज्ञानांचा अवलंब करता येतो.

बागायती शेतीचे फायदे जसे आहेत, तसेच काही तोटे देखिल आहेत, त्यापैकी काही प्रमुख तोटे पाहुयात.

१) उच्च खर्च – सिंचनाची साधने, पाण्याच्या सोयी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यासाठी सुरुवातीचा खर्च मोठा असतो.

२) पाण्याची कमतरता – पाण्याचा अपव्यय किंवा वाया जान ही मोठी समस्या असू प्रकिन सनन पाण्याचा वापर केल्यास भूजल पातळी खालावू शकते.

३) रासायनिक अवलंबित्व- अधिक उत्पदनासाठी शेतकरी रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर वाढवतात, ज्यामुळे पर्यावरणावर विपीन परिणाम मातीची गुणवत्ता कमी होते.

४) जोखीम – जर पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केले नाही तर पिकांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, अनपेक्षित ह‌वामान बदल्यामुळे पाणी व्यवस्थापनाच्या योजना अपयशी ठरु शकताता.

५) समतोल बिघडणे एका विशिष्टा स्रोतात सतत बागायती शेती केल्यास नैसर्गिक समतोल बिघडू पर्यावरणातील समतोल बिघडू शकतो, ज्यामुळे स्थानिक जैवविविधता कमी होण्याचा धोका असतो.

बागायती शेतीच्या या तोट्यांचा विचार करून पाण्याचे आणि जमिनीचे योग्य व्यवस्थापन केल्यास या समस्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *