नकली बियाणे व कीटनाशके बाबत काय सांगतो कायदा? फसवणूक झाली तर ताबडतोब करा ‘या’ गोष्टी आणि मिळवा थेट कायद्याची मदत…

शेतकरी आपल्या शेतात पीक पिकवण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या बि – बियाणांचा वापर करत असतात. पण या बियांची पेरणी केल्यावर कधी कधी हे पेरलेले बी अजिबातच उगवत नाही. यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या लक्षात येत की आपल्याला कंपनी मार्फत पुरवण्यात आलेले बी खराब आहे किंवा नकली आहे. आपली झालेली फसवून त्यांच्या लक्षात येते पण आता करावं तरी काय असा प्रश्न आपल्या सर्वच शेतकरी बांधवांना पडतो.

1986 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. खर तर संयुक्त राष्ट्रांनी हा कायदा निर्माण व्हावा या साठी 1985 मध्ये सूचना केल्या होत्या. ग्राहकांचे हक्क जोपासणे आणि त्यांना संरक्षण देणे हे या कायद्याचे महत्वाचे काम तर ग्राहकांना जलद, स्वस्त, वीणा कटकटीचा न्याय मिळवून देणे हे या कायद्याचे मुख्य तत्व आहे.

1982 मध्ये कत्राटाचा कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. आता या कायद्यात ग्राहकांसाठी कोणते कोणते हक्क सांगितलेले आहेत हे आपण पाहुयात.
धोकादायक वस्तूपासून ग्राहकांचे संरक्षण करणे, ग्राहकांना उत्पादनांची गुणवत्ता, वजन , क्षमता, निर्मलता ही माहिती मिळवण्याचा अधिकार/ हक्क आहे. सर्व उत्पादित वस्तू तपासण्याचा हक्क , ही उत्पादित वस्तू ग्राहकांच्या पसंतीची नसल्याचं त्याविषयी तक्रार करण्याचा अधिकार, ग्राहकांची पिळवणूक, लुबाडणूक टाळण्यासाठी देखील या कायद्यात या संबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. तसेच ग्राहकांना त्यांचे हक्क अधिकार याची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून मिळवून घेण्यासाठी या कायद्यात ग्राहक प्रशिक्षणाचा हक्कची देखील तरतूद करण्यात आलीय.

व्यापाऱ्याने जर आपली फसवणूक केली आपल्याशी लबाडी केली तर ग्राहक तक्रार मंचाकडे आपण तक्रार करू शकता. याचसोबत जर ग्राहकांनी खोटा माल पुरवला, वसतू सेवा यांच्या पुरवठ्यात कमतरता असेल तसेच जर छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत ग्राहकांकडून घेण्यात आली तर ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार नोंदवता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *